परिस्थितीने माणसावर लादलेले एकाकी मरण आणि नदीपात्रातून बेवारस अवस्थेत वाहत गेलेले असंख्य मृतदेह, या दोन गोष्टींच्या मध्ये आज जगाला घेरून असलेल्या मानवी शोकांतिकेचा भलामोठा व्रण आकार घेत चालला आहे...
वैश्विक महासाथीने जसे माणसाच्या जगण्याचे संदर्भ बदलून टाकले, तसेच मरणानंतरच्या क्षणांचेही संदर्भ बदलून टाकले. धर्म कोणताही असू दे, संस्कृती कोणतीही असू दे, लौकिक जग सोडून गेलेल्या देहास अखेरचा म्हणून मायेचा स्पर्श करणे, ही प्रेमाचे दर्शन घडवणारी एक उदात्त कृती असते. याच कृतीचा अभाव वर्तमानातले रितेपण अधोरेखित करत आले आहे.......